विकास फक्त बारामतीतच होतोय; राष्ट्रवादीच्या ‘या’ ज्येष्ठ आमदाराने दिला घरचा आहेर

पुणे :

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या भागात राष्ट्रवादीला त्यांच्याच आमदाराने आव्हान दिले आहे. ‘पुणे जिल्ह्यात विकास फक्त  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती आणि  कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावात होत आहे’, असे म्हणत खेडचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते यांनी दिला आहे.

भामा आसखेड धरणाच्या पाण्यावरून आक्रमक झालेल्या मोहिते यांनी थेट पक्षश्रेष्ठींवरच निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने अशा प्रकारे आव्हान करत पक्षाला टोला लगावल्यामुळे आता त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करतो, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. आपण आता वेगळा विचार करत असल्याचा सूचक इशाराही मोहितेंनी यापूर्वी दिला होता.

महाविकास आघाडीचे सरकार असे चमत्कारिकरित्या एकत्र आल्याने तिन्ही पक्षातील अनेकांना मंत्रीपदाची संधी भेटली नाही, त्यामुळे अनेक जन नाराज होते. नाराज असणाऱ्यामध्ये मोहितेही होते. तसेच भीमाशंकर परिसर देवस्थान विकास यावरून त्यांनी दिलीप वळसे यांच्यावरही टीका केली होती. आणि आता तर मोहितेंनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here