काढ्याचे अतिसेवन करताय; सामोरे जावे लागेल ‘या’ दुष्परिणामांना

कोरोना या महाभयंकर विषाणूने जगभर थैमान घातलेले आहे. या विषाणूंचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती असणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून सध्या अनेक घरगुती उपाय वापरले जात आहेत. प्रामुख्याने गरम पाणी तसेच वेगवेगळ्या आयुर्वेदीक पद्धतीचा वापर करत काढे तयार करून त्याचे सेवन केले जात आहे. मात्र काही लोक भीतीपोटी काढ्याचे जास्त प्रमाणात सेवन करत आहेत. अर्थात लोकांना आता त्याचे दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. त्यामुळे प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करणे अतिशय गरजेचे आहे.

असे होताहेत दुष्परिणाम :-

  • सातत्याने काढ्याचे सेवन करत असाल तर अॅसीडीटी आणि छातीत जळजळ सुरु होते.
  • सतत गरम पाणी पिले घशाचा त्रास सुरु होतो. परिणामी तुम्हाला भीती वाटू शकते. त्यामुळे कोमट पाणी प्यावे.
  • शरीरातील उष्णता वाढते. उष्णतेमुळे ईतरही त्रास सुरु होतात.
  • हात पायांची आग होणे हा कॉमन त्रास आता काढ्यांचे अतिसेवन करणाऱ्यांना जाणवू लागला आहे.
  • गुळवेळ, अश्वगंधा, काळीमिरी, दालचिनी व इतर काढ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीचे सेवन जास्त झाले तर ईतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

कुठलीही गोष्ट अती केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच काढे घ्या. त्याचे प्रमाण ठरवा.

संपादन : संचिता कदम

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here