मुंबई :
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे तसेच ठाकरे सरकारवर एखाद्या नेत्याच्या अविर्भावात टीका करणारे बिहारच्या माजी DGP गुप्तेश्वर पांडे यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. JDU कडून त्यांना तिकीटही मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारचे प्रभारी आहेत. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने ‘फडणवीसांनी गुप्तेश्वर पांडे यांच्या उमेदवारीला निकराचा विरोध करायला हवा’, असे म्हणत फडणवीस यांना सल्लाही दिला आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल.
सल्ला देताना कॉंग्रेसने त्यांना इशाराही दिला आहे. सावंत यांच्या या ट्वीटवर विविध प्रतीक्रिया आलेल्या आहेत. दिनेश नवल यांनी म्हटले आहे की, फडणवीस समर्थ आहेत ना जनतेच्या प्रश्नांना तोंड द्यायला, तुम्ही का फुकटचा सल्ला देता त्यांना.
धनंजय पठारे यांनी म्हटले आहे की, सचिन सावंत म्हणजे महाराष्ट्राची जनता नाही आणि सचिन सावंत यांनी विचारलेले प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचे प्रश्न नाहीत. कारण सचिन सावंत यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले म्हणजेच जनतेने पूर्णपणे नाकारले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- ‘व्हीएसटी’ने आणलाय ‘नेक्स्ट जन ३० एचपी ट्रॅक्टर’; पहा काय आहेत फीचर्स
- मुलींच्या शिक्षणासाठी तसेच महिलांच्या प्रगतीसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘एवढा’ मिळणार लाभ
- पेट्रोलचा भडका: 18 दिवसात झाली 5 वेळा दरवाढ; वाचा काय आहेत ताजे दर
- औरंगाबादचे नाव बदलताय; मग ‘त्या’ वास्तूंचे काय?
- मोदींच्या ‘त्या’ गाजलेल्या विधानावरून शिवसेनेचा सवाल; वाचा, काय उघडकीस आणलेय शिवसेनेने