धक्कादायक! ‘क्वारंटाइन’मुळेच 18 हजार लोक कोरोनाबाधित, 700 लोकांचा मृत्यू; वाचा नेमका काय घडला प्रकार

दिल्ली :

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. त्याची विविध लक्षणे समोर येत आहेत. तसेच कोरोनाच्या लसीसह ईतरही विषयावरील संशोधन समोर येत आहे. अशातच कोरोना सबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्वारंटाइनमुळे कोरोना पसरू नये हा हेतू होता. परंतु ऑस्ट्रेलियात क्वारंटाइनच्या पद्धतीमुळे कोरोना पसरला असल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण :-

ऑस्ट्रेलियात हॉटेल क्वारंटाइन करताना अनेकदा तेथील कर्मचारी प्रशिक्षित नसल्यामुळे तसेच योग्य त्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे कोरोना पसरल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा हॉटेल क्वारंटाइन प्रोग्राम अयशस्वी झाला आहे आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला आणि त्यामुळे कित्येकांचा जीवही गेला.   

या ऑस्ट्रेलिया हॉटेल क्वारंटाइन प्रोग्राममुळे 768 लोकांचा मृत्यू झाला असून 18 हजार लोक कोरोनाबाधित झाले असल्याचे वृत्त डेली मेलचा हवाला देत आजतकने दिले.  

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार कर्मचाऱ्यांना निट प्रशिक्षण दिले नाही, प्रोटेक्टिव्ह गिअरचा योग्य वापर केला नाही, सोशल डिस्टन्सिंगचंही पाळलं नाही यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, असा आरोप केला जात आहे. मेलबर्नमध्ये कोरोनाची दुसरी लाट या ऑस्ट्रेलिया हॉटेल क्वारंटाइन प्रोग्राममुळे पसरली असल्याचाही आरोप होतो आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here