Whatsapp घेऊन येत नाविन फिचर; वाचा ‘एक्सपायरिंग मीडिया’बाबत महत्वाची माहिती

Whatsapp ही मोबाइल अॅप्लिकेशन वापरत नसलेले खूप कमी भेटतात. इतकी याची अवघ्या जगाला सवय झाली आहे. त्याच Whatsapp ने आता आणखी एक नवीन फिचर आणण्याची तयारी केली आहे. ‘एक्सपायरिंग मीडिया’ नावाचे हे नवे फिचर अनेकांना आवडू शकते. मात्र, ते कधी सुरू होणार याबाबत कामिनीने अजूनही घोषणा केलेली नाही.

 मीडिया फाइल्स अर्थात इमेज, वीडियो, GIF प्राप्तकर्ता यूजर याच्याकडे भेटले आणि त्याने एकदा पहिले की ते अपोआप डिलीट होण्याची ही सोय देणारे फिचर असणार आहे. Wabetainfo यांनी याबाबतची माहिती देणारे फिचर आर्टिकल प्रसिद्ध केले आहे.

2.20.201.1 बीटा या व्हर्जनमध्ये हे फिचर जोडण्यात आलेले आहे. पाठवणाऱ्याने कोणतीही गोष्ट पाठवताना समवेत ‘व्यू वन्स’ (View Once)  असे बटन जोडले की पाहणाऱ्याला संबंधित पोस्ट फ़क़्त एकदाच पाहायला मिळण्याची सोय असेल. अशी सोय आल्यास अनेकांना मोबाइलमध्ये सेव्ह होणाऱ्या अनावश्यक पोस्ट डिलीट करीत बसण्याची आवश्यकता असणार नाही.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here