म्हणून शिवसेनेच्या वतीने संजय राऊतांनी केले ‘त्या’ पक्षाचे कौतुक; भाजपला डिवचले

मुंबई :

NDAतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडले आहे. सत्ताधारी पक्षाने संमत केलेले शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे सांगत केंद्रीय कृषीमंत्री पदाचा राजीनामा अकाली दलाच्या सदस्यानी दिला. त्यानंतर अकाली दलाने शेतकरी विधेयका विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आणि गेल्या २ दिवसात अधिकच आक्रमक होत अकाली दलाने NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अकाली दलाने घेतलेल्या या निर्णयाचे राऊत यांनी कौतुक केले आहे.

राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या हितासाठी NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणाऱ्या अकाली दलाचे शिवसेनेला कौतुक आहे.

नुकतीच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली. सदर बैठक २ तासांची होती. विशेष म्हणजे या बैठकीबद्दल दोन्हीही पक्षातील पदाधिकाऱ्यांना माहिती नव्हती. या बैठकीनंतर विविध चर्चांना उधान आले होते. शिवसेना – भाजप परत एकत्र येण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण आता राऊतांनी अकाली दलाचे कौतुक करत भाजपला डिवचले आहे. राऊत यांनी केलेल्या ट्वीटनंतर मात्र शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या चर्चेला लगाम लागला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here