ई-कॉमर्स ही कालची गरज आहे. आपले उत्पादन थेट जगभरातील ग्राहकांना खुले करून उत्तम सेवा देण्याची ही संधी आहे. त्यातच २०१६ पर्यंत भारतात ई कॉमर्स बिजनेस थेट २०० अब्ज डॉलर होणार असल्याचा अंदाज आहे. अशावेळी अमेझॉन-फ्लिपकार्ट यांना टक्कर देण्यासाठी आता भारतातील एक दिग्गज संस्था बाजारात उतरत आहे.
CAIT अर्थात कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असे या संस्थेचे नाव आहे. देशातील व्यापाऱ्यांची ही सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेच्या सभासद आणि व्यापार्यांच्या मदतीने देशभरात आपली साखळी तयार करण्यासाठी CAIT यांनी तयारी केली आहे. ‘भारत ई-मार्केट’ (BHARAT E-MARKET) नावाचे ई कॉमर्स पोर्टल आणण्याची तयारी या संघटनेने केली आहे.
ई कॉमर्स रेगुलेटरी अथॉरिटी स्थापन करून भारत सरकारने या व्यवसायाला ठोस नियमावलीची जोड देण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील महत्वाचे घटक आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशीही या संघटनेची चर्चा चालू आहे. ऑनलाईन बाजार व्यवस्थेत भारतीय व्यापाऱ्यांना टिकून राहण्यासह ग्राहक आणि छोटे व्यापारी यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी खास नियमावली आणण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीन खंडेलवाल यांनी याबाबत सांगितले की, शहरी भागात सध्या ४२ टक्के लोक ऑनलाईन पद्धतीने खरेदी करतात. कोविड १९ ची साथ सुरू होण्यापूर्वी फ़क़्त ६ टक्के यावर घुटमळत असलेला ई कॉमर्स बिजनेस आता २४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे सरकारने परदेशी गुंतवणूक यामध्ये येतानाही योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. या संघटनेने दिवाळीच्या सीजनपूर्वी ऑक्टोबर २०२० मध्येच आपले नवे पोर्टल आणण्याची तयारी केल्याचे फायनान्शियल एक्स्प्रेस या वृत्तपत्राने म्हटले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
- प्रचंड व्हायरल झालेली ही जबरदस्त कविता नक्कीच वाचा
- निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी; वाचा आणि पोटभर हसा
- ‘त्या’ एका कारणामुळे जगभरात सिग्नल अॅप झाले डाउन; युजर्सने केली तक्रार
- अवघ्या 5 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत ‘हे’ टॉप 4 स्मार्टफोन; वाचा, जबरदस्त फीचर्सविषयी
- ‘त्यांना’ कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; शिवसेनेचा टोला