राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची आत्महत्या; ‘त्यांनी’ केली चौकशीची मागणी

औरंगाबाद :

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने घाटी रूग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. काकासाहेब श्रीधर कणसे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते राजकारणात सक्रीय होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद त्यांच्याकडे होते तसेच ते पंचायत समिती सदस्यही होते. कोरोनाबाधित असलेल्या कणसे यांनी आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी आमदार संजय वाघचौरे यांनी कणसे यांच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कणसे यांच्या पत्नीही कोरोनाबाधित असून त्याही कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. २१ सप्टेंबरला कणसे हे कोरोनाबाधित असल्याचे समजले. नंतर २४ तारखेला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे ICUमध्ये दाखल करण्यात आले. नंतर कणसे यांनी शौचालयात जायचे आहे असे सांगितले पण त्यांना शौचालयात जाण्यास परवानगी नसल्याने त्यांना पॉट दिला आणि त्या विभागातील कर्मचारी बाहेर थांबले. कणसे यांनी बेडजवळ असलेल्या खिडकीतून खाली उडी टाकली.

यानंतर माजी आमदार वाघचौरे यांनी सदर घटनेबाबत चौकशी केली. डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर वाघचौरे यांनी ‘२४ सप्टेंबरला काकासाहेब कणसे यांना व्हेंटिलेटर मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. बेड उपलब्ध असूनही दोन तासांनी काकासाहेबांना बेड देण्यात आले. काकासाहेबांनी आत्महत्या का केली?’, असा सवाल केला आहे. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here