राऊत- फडणवीस भेटीनंतर शरद पवार ठाकरेंच्या भेटीला; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

मुंबई :

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल गुप्त बैठक झाली. या बैठकीविषयी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना माहिती नव्हते. या भेटीनंतर राज्यासह देशाच्या राजकीय पटलावर अनेक अंगाने चर्चा सुरु झालेल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले आहेत.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचीही बैठक तातडीची आहे, असे समजले असले तरी बैठकीचा नेमक विषय अद्याप समजलेला नाही. काल राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीची माहिती सुरुवातीला गुप्त ठेवण्यात आली मात्र माध्यमांनी बातम्या दाखवल्यावर मात्र फडणवीस आणि राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन आपापली भूमिका स्पष्ट केली. राऊत – फडणवीस बैठक होईपर्यंत मात्र दोन्हीही पक्षाच्या नेत्यांना याविषयी माहिती देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहेत.

कदाचित याच मुद्द्यावरून अलर्ट झालेल्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली असावी. राज्यात सुरु असलेले वाद आणि प्रश्न यावर पवार आणि ठाकरे यांच्यात चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here