राऊत- फडणवीस भेटीनंतर राऊतांनी ‘त्या’ विषयावरून भाजपला डिवचले; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल गुप्त बैठक झाली. या बैठकीविषयी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना माहिती नव्हते. या भेटीनंतर राज्यासह देशाच्या राजकीय पटलावर अनेक चर्चा सुरु झाल्या. शिवसेना – भाजप परत एकत्र येण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र राऊतांनी आता भाजपला डीवचल्यामुळे आता ते एकत्र येण्याच्या चर्चा थांबल्या आहेत.

शेतकरी विधेयकाच्या मुद्द्यावरून अकाली दलाने अधिकच आक्रमक होत NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्वीट करत अकाली दलाचे कौतुक केले आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या हितासाठी NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणाऱ्या अकाली दलाचे शिवसेनेला कौतुक आहे.      

NDAतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडले आहे. सत्ताधारी पक्षाने संमत केलेले शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे सांगत केंद्रीय कृषीमंत्री पदाचा राजीनामा अकाली दलाच्या सदस्यानी दिला. त्यानंतर अकाली दलाने शेतकरी विधेयका विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आणि गेल्या २ दिवसात अधिकच आक्रमक होत अकाली दलाने NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here