‘ते’ सगळंच स्क्रिप्टेड आहे; ‘या’ कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

मुंबई :

सध्या महाराष्ट्र तसेच देशाच्या पटलावर एक राजकीय अस्वस्थता निर्माण झालेली आहे. कोरोनाने घातलेले थैमान हे या अस्वस्थेत भर घालत आहे. ही अस्वस्थता निर्माण होण्याचे कारण म्हणजे सध्या अनेक विषयांवर वाद-विवाद सुरु आहेत. अशातच कॉंग्रेस नेते व माजी आमदार भाई जगताप यांनी हे सगळं स्क्रिप्टेड असल्याचा दावा केला आहे.

त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोरोना झाला – सुशांत सुशांत

चीनी सैन्य भारतात घुसले – रिया रिया

GDP मध्ये घसरण – कंगना कंगना

शेतकरी रस्त्यावर उतरले – दीपिका दीपिका

अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगत हे सगळं स्क्रिप्टेड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जगताप यांच्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. बहुतांश प्रतिक्रिया या जगताप यांचे समर्थन करणाऱ्या आहेत. अभिजित भाईप यांनी म्हटले आहे की, काँग्रेसची कुरकुर ही संजय राऊत आणि फडणवीस भेट झाल्यामुळे होतेय. तर प्रीती यांनी म्हटले आहे की, मोदींनी पंतप्रधान पद मिळवले – EVM मध्ये गडबडी करून..

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here