ब्रेकिंग : मोदी सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

यंदा लवकरच पाउस झाल्याने खरीप हंगामातील पिक लवकर बाजारात येणार आहे. त्यातच शेतकरी आंदोलनाचीही धग देशभरात जाणवत आहे. या दोन्हींमुळे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तातडीने तांदूळ खरेदीला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत.

अगदी ज्या पद्धतीने कांदा निर्यातबंदी एकाच झटक्यात लागू करण्यात आलेली होती. याच पद्धतीने पंजाब आणि हरियाना येथील शेतकऱ्यांचा तांदूळ सरकारी हमीभावाने खरेदीचा आदेश काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आजपासून या दोन्ही राज्यांमध्ये सरकारी तांदूळ खरेदीला सुरुवात होणार आहे. त्याचवेळी देशातील इतर राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२० पासून हमीभावाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

यंदा सरकारने सध्या तांदळाला १८६८ रुपये हमीभाव, तर ग्रेड १ च्या तांदळाला १८८८ रुपये इतका हमीभाव जाहीर केलेला आहे. त्यानुसार सरकारी खरेदी होणार आहे. पंजाबात ११३ लाख आणि हरियाना राज्यात ४४ लाख टन इतक्या तांदूळ खरेदीचे नियोजन आहे. यंदाच्या हंगामात देशभरातील ४९५.३६ लाख टन इतक्या तांदूळ खरेदीचा लक्षांक ठेवण्यात आलेला आहे.

केंद्रीय अन्न मंत्रालयाने भारतीय खाद्य निगम (FCI) यांच्या सहकार्याने ही खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गहू आणि तांदूळ या दोन्ही पिकाच्या सरकारी खरेदीचे नियोजन प्रतिवर्षी खूप तातडीने केले जाते. त्याचवेळी महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये कोणत्याही पिकाला हमीभाव आणि त्याच्या सरकारी खरेदीवर शेतकरी अडून बसत नाही त्यामुळे यंदाही खरीपात मूग, उडीद, बाजरी आणि इतर सर्व पिकांना महाराष्ट्रात योग्य हमीभाव मिळालेला नाही.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here