राऊत- फडणवीसांच्या भेटीनंतर चंद्रकात पाटलांचं मोठं विधान; वाचा, काय म्हटले त्यांनी

मुंबई :

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या काल झालेल्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली आहे. विविध तर्क लावले जात आहेत. राऊत यांनी आपण सामनाच्या मुलाखतीसाठी विषयावर बोलण्यासाठी गेलो असल्याचे स्पष्ट केले. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘गेल्या नऊ महिन्यांपासून सरकार पडणार अशी चर्चा सुरू आहे. पण फडणवीस, मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं, म्हटलं नाही. पण हे सरकार अंतर्गत विरोधामुळं पडेल’, असे म्हणत सूचक विधान केले आहे.

पुढे त्यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही. राजकीय क्षेत्रात भिन्न पक्षांचे लोक असे अधूनमधून भेटत असतात. पण त्यातून काहीतरी बातमी निर्माण होईल, असं नाही.

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार या बैठकीबाबत दोन्हीही पक्षातील वरिष्ट किंवा इतर पदाधिकाऱ्यांना माहिती नव्हती. ही बैठक शक्य होईल तेवढे गुप्त ठेवण्याचे फडणवीस आणि राऊतांचे नियोजन होते.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here