रिलायन्सला आले आणखी अच्छे दिन; रिटेलमध्ये ‘त्या’ कंपनीने केली इन्व्हेस्टमेंट

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीसह त्यांच्या छोट्या-मोठ्या उपकंपन्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेले आहे. कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक भेटत असल्याने शेअर होल्डर्सनाही खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेले आहेत.

जगभरातील अर्थव्यवस्था दोलायमान झालेल्या असतानाही शेअर बाजारात बरे चालले होते. मात्र, मागील आठवड्यात तिथेही मोठी पडझड झाली. मात्र, रिलायन्सच्या रिटेलिंग डिव्हिजनमध्ये अमेरिकन कंपनी सिल्व्हर लेक यांनी गुंतवणूक केल्याने पुन्हा एकदा भारतीय बाजारात चैतन्य येण्याची चिन्हे आहेत. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट घेणाऱ्या रिलायन्सला आता रिटेल विभागातही मोठी गुंतवणूक मिळायला सुरुवात झालेली आहे.

रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) यामध्ये अमेरिकेतील SLP रेनबो होल्डिंग्स प्राइवेट लिमिटेड (सिल्वर लेक) यांनी ७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम दिली आहे. त्याद्वारे RRVL मध्ये त्या कंपनीने १.७५ % इतकी हिस्सेदारी मिळवली आहे. एकूणच रिलायन्स समूहाला पुढील काळात आणखी अच्छे दिन येण्याची शक्यता यानिमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे.

सिल्वर लेक कंपनी जगभरातील दिग्गज कंपन्यांमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करून बसलेली आहे. सध्या त्यांना रिलायन्स कंपनीमध्ये मोठे फ्युचर असल्याचे वाटत असल्याने त्यांनी यामध्ये गुंतवणुकीस प्राधान्य दिलेले आहे. या कंपनीने Airbnb, अलीबाबा, अल्फाबेट Verily & Waymo यूनिट्स, डेल टेक्नोलॉजीज, ट्विटर यासह अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये आपला हिस्सा ठेवलेला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here