कॅगने ठेवला ‘तो’ ठपका; पहा GST बाबत कोणती कार्यवाही केलीय मोदी सरकारने

कॅग या यंत्रणेने लेखापरीक्षण करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेमधील अनागोंदी उघडकीस आणली होती. आता त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जीएसटी भरपाई निधी कन्सॉलिडेटेड फंडात (सीएफआय) वळता करून अन्यत्र वापरल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.

संसदेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालातून ही महत्वाची माहिती पुढे आलेली आहे. भरपाई निधी बेकायदेशीररीत्या सीएफआयमध्ये वळविल्यामुळे महसूल संकलनाचे आकडे वाढलेले आहेत. तसेच वित्तीय तुटीचे आकडे कमी झालेले असल्याचे दिसत असल्याचे त्यात स्पष्ट म्हटले आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षांत केंद्र सरकारने तब्बल ४७,२७२ कोटींचा जीएसटी भरपाई निधी कन्सॉलिडेटेड फंडात (सीएफआय) वळता करून अन्यत्र वापरला आहे.

नुकसान भरपाई अधिभार निधीतून एकूण ४७,२७२ कोटी रुपये ‘शॉर्ट-क्रेडिटिंग’ म्हणून दाखविले गेले आहेत. त्यामुळे राज्यांना कर्ज घेऊन खर्च भागवण्याचेही केंद्राने सूचित केले होते. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा जीएसटी हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here