राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण

पुणे :

१४ ऑगस्टला ट्वीट करत कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी कोरोना लस वितरणाबाबत काही सूचना केंद्र सरकारला केल्या होत्या. केंद्र सरकारने सदर सूचना किती गांभीर्याने घेतल्या हा वेगळा मुद्दा आहे. परंतु राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला मुद्दा आज पुन्हा सिरम इंस्टीट्यूटचे (सिरम इंस्टीट्यूट जिथे कोरोनावर लस बनविण्याचे काम चालू आहे) संचालक अदर पूनावाला यांनी ट्वीट करत आठवण करून दिली आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कोरोनाची लस विकत घेण्यासाठी, ती भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. येत्या काळासाठी हे आपल्यासमोरील खरे आव्हान असेल.

पूनावाला यांनी उपस्थित केलेला मुद्दा राहुल गांधींनी दीड महिन्यापूर्वीच उपस्थित केला होता. केंद्र सरकारकडे लस वितरण करण्याची एक रणनीती असायला हवी. कोरोनासाठीची लस बनवणाऱ्या देशांपैकी भारत हा एक देश असेल, असाही विश्वास त्यावेळी राहुल यांनी व्यक्त केला होता.

विरोधी पक्षाचा नेता म्हणून केंद्र सरकार राहुल गांधींची दखल घेत नसले तरी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेणे गरजेचे आहे. कारण कोरोना विषाणूची साथ भारतात येऊ नये यासाठी सर्वात आधी सरकारला जागे करण्याचे काम राहुल यांनी केले होते. त्यावेळीही राहुल यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना गांभीर्याने न घेतल्यामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले आहे. यावेळी तरी राहुल गांधी आणि अदर पूनावाला यांनी उपस्थित केलेला मुद्दा केंद्र सरकार गांभीर्याने घेते की नाही याकडे राजकीय वर्तुळाचे आणि आरोग्य यंत्रणांचे लक्ष लागलेले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here