सिरमच्या पूनावालांनी पंतप्रधान मोदींना करून दिली ‘ही’ आठवण; भारतासमोर आहे ‘हे’ आव्हान

पुणे :

कोरोनाने घातलेले थैमान अद्यापही आटोक्यात आलेले नाही. जगभरात प्रसिद्ध औषधासाठी असलेल्या आणि सध्या कोरोनावर लस बनवत असलेल्या सिरम इंस्टीट्यूटच्या अदर पूनावाला यांनी ट्वीट करत भारतासमोर असलेल्या आव्हानविषयी भाष्य केले आहे. पूनावाला यांनी म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कोरोनाची लस विकत घेण्यासाठी, ती भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आणि या यंत्रणेसाठी पुढच्या एका वर्षात भारत सरकारला ८०,००० कोटी उपलब्ध होतील का? असा सवाल पूनावाला यांनी केला आहे. 
पूनावाला यांनी ट्वीट म्हटले आहे की, येत्या काळासाठी हे आपल्यासमोरील खरे आव्हान असेल. पूनावाला यांच्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विवेक जैन यांनी म्हटले आहे की, सगळा आर्थिक भार सरकारने का घ्यावा? ज्यांच्या पैसे असतील ते लोक स्वतः लस विकत घेतील.
डॉक्टर विष्णू वर्धन यांनी म्हटले आहे की, माझ्या कुटुंबासाठी लस विकत घेण्याची माझी तयारी असताना त्यासाठी सरकारने का पैसे भरावे. तर जीविका उठाडा यांनी म्हटले आहे की, संसदेच्या इमारतीचे बांधकाम निघाले आहे. असे इतर अनाठायी खर्च टाळले तर काम होऊ शकते.
तर पूनावाला यांच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या विधानावरूनही काही लोकांनी त्यांना सुनावले आहे. पूनावाला यांनी ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला टॅग केले आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here