महाराष्ट्र भाजपने दिल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अशा खोचक शुभेच्छा; करून दिली ‘त्या’ प्रसंगाची आठवण

मुंबई :

आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमांमध्ये त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातही महाराष्ट्र भाजपने डॉ.सिंग यांना खोचक अशा शब्दात शुभेच्छा देत कॉंग्रेसला टोला लगावला आहे. महाराष्ट्र भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी डॉ.सिंग यांना शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, कॉंग्रेसचे शेवटचे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. RBI चे Governor व भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी सदैव स्मरणात राहील.

वाघ यांनी पुढे एका प्रसंगाची आठवण करून देत म्हटलं आहे की, नव्या शेती सुधारणा कायद्यातील तरतुदी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात असुनही त्याला आता विरोध करणं ही कॉंग्रेसची संस्कृती आहे. आज ज्याचा वाढदिवस आहे त्या श्री मनमोहन सिंग यांचा अध्यादेश राहुल गांधी यांनी टराटरा फाडला होता हे आपण लक्षात ठेवायला हवे.      

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here