रोहित पवारांनी ‘तिच्या’ कर्तव्यदक्षतेला ठोकला सलाम; हेच आहे देशातील ‘आशा’दायक चित्र

कर्तव्यभावना जपण्यासाठीची भावना ज्यांच्यामध्ये आहे त्यांना किती पगार आणि मानधन मिळते याचे काहीच कौतुक नसते. ग्रामीण भागातील अनेक सरकारी कर्मचारी अशीच सेवा देतात. त्यापैकीच एक महत्वाचे पद म्हणजे आशा सेविका. मालेगाव (जि. नाशिक) येथील एका आशा सेविकेच्या कामाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सलाम ठोकला आहे.

पवारांनी ट्विटरवर म्हटले आहे की, बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्यातूनही मार्ग काढणाऱ्या मालेगाव तालुक्यातील मालू अहिरे या आशाताईंनी बजावलेल्या कर्तव्याचा मला अभिमान आहे. ताई तुम्हाला माझा सलाम!

सकाळ वृत्तपत्राच्या बातमीची लिंक शेअर करून रोहित पवार यांनी आपली ही भावना व्यक्त केली आहे. चिखल ओहोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मालू अहिरे यांच्याबद्दलची ही बातमी आहे. त्यांनी पोलिओ डोस देण्यासाठी पाण्यातून वाट काढीत आपले कर्तव्य बजावले आहे. अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

रोहित पवार यांनीही या बातमीची दखल घेऊन त्यांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम ठोकला आहे. त्यावर राजन नावाच्या ट्विटरवरील खातेदाराला आमदार म्हणून पवार आणि एकूणच राज्य व केंद्र सरकार यासह सर्व राजकीय पक्षांना त्यांचे कर्तव्य लक्षात आणून देणारे प्रत्युत्तर दिले आहे.

राजन यांनी म्हटले आहे की, मुळात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षे होउन ही, अशी वेळ येते हे राज्यकर्त्यांचे अपयश नाही तर काय आहे? जिथे लोकांना अशा पायाभूत सुविधा मिळायला इतक्या अडचणी येतात..

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here