सुशांत प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केलेल्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची राजकारणात एन्ट्री

दिल्ली :

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठे वादंग सुरु झाले. नंतर त्याला राजकीय जोडही भेटली आणि हे प्रकरण देशाच्या राजकीय पटलावर गाजू लागले. नंतर पोलीसांवरूनही अनेक विवाद झाले. अशातच सुशांत सिंग प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केलेले बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे राजकारणात प्रवेश करणार आहेत. अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये किंवा जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.   

अशातच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली आहे. भेट झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना मात्र त्यांनी आपण राजकीय विषयावर बोलायला आलो नव्हतो. ही भेट सहज होती, असे सांगितले. मात्र सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार त्यांचा प्रवेश निश्चित झाला असून बिहार निवडणुकीच्या ऐन धुमाकुळात पांडे जेडीयूमध्ये प्रवेश करणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी नितीशकुमार हे बेस्ट मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. तसेच त्यांचे कौतुकही केले होते.   

पांडे यांच्याबाबतीत घडलेल्या एकूणच सर्व घडामोडी लक्षात घेता पांडे हे राजकारणात उतरणार हे निश्चित दिसत आहे. निवडणुकीचा मुद्दा बनलेल्या विषयावरून भाष्य करणे, अचानक स्वेच्छा निवृत्ती घेणे, सत्ताधारी पक्षाचे तसेच मुख्यमंत्र्याचे कौतुक करणे, भेटी घेणे, अशा अनेक गोष्टी ते करत आहेत.     

वाल्मिकीनगरमधून लोकसभा पोटनिवडणूक असल्याने पांडे तेथूनच निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता सांगितली जात आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here