करोना कालावधीत शेतकऱ्यांनी घ्यावी ‘ही’ काळजी; वाचा महत्वाची माहिती

सध्या करोना महामारीने अवघ्या जगभरात मोठे संकट उभे केलेले आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अशावेळी आणि आता पुढील कालावधीतही शेतकऱ्यांनी आणि पशुपालाकांनी काही महत्वाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबतच्या सूचना जरी केलेल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, लोकडाऊन शिथिल होत असल्याच्या काळात वैयक्तिक अंतर, मास्क, सॅवनटायझर, वेळोवेळी साबणाने हात धुण्यासह रेड झोनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. शेतीच काम करतानाही स्वच्छता आणि दोघांमधील अंतर ६ फुट राहील याची काळजी घ्यावी. एकाच दिवशी जास्त लोक अजिबात एकत्र येऊन काम करू नका. तसेच यांत्रिक कामाला प्राधान्य द्या. शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि पॅकेजिंग साहित्य निर्जंतुक करून वापरा.

पुढे दुग्धोत्पादाकांना सूचना देताना म्हटले आहे की, दुधाची धार काढण्यापूर्वी आणि नंतर साबण वापरून हात आणि भांडी स्वच्छ धुवून घ्यावेत. दुधाचे वितरण आणि विक्री करताना मास्क वापरावा. अंतराची काळजी घ्यावी. पोल्ट्रीमध्ये काम करतानाही असेच सर्व नियम पाळावेत. अशा पद्धतीने योग्य ती सर्व काळजी शेकारायंनी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ICAR-NIASM यांनी त्यांच्या बुलेटिनमध्ये यास प्रसिद्धी दिली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here