‘तो’ कायदा तुम्ही पंतप्रधान व्हाल तेव्हा पारित करून घ्या; भाजपचा राऊतांना टोला

मुंबई :

बिहारमधील कोरोना संपला आहे का? संपला आहे असे निवडणूक आयोगाला व राज्यकर्त्यांना वाटत असेल तर तसे त्यांनी जाहीर करावे. तसेच लालूप्रसाद यादव हे रुग्णालयात आहेत. कॉंग्रेसचे तिथे फार अस्तित्व नाही, असे म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीच्या निर्णयासाठी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितले की, चाराचोर लालू यादव हे तुरुंगात आहेत. शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात रहायला नको म्हणुन आजारी पडले आहेत व इस्पितळांत दाखल झाले आहेत.

‘आता एखादा नेता आजारी आहे म्हणून निवडणुका न घेण्याचा कायदा तुम्ही ज्यावेळी पंतप्रधान व्हाल तेव्हा पारित करून घ्या. आमची हरकत नाही’, असे म्हणत वाघ यांनी राऊतांना टोलाही लगावला.

यावेळी वाघ यांनी पुन्हा कंगना प्रकरणावरून शिवसेनेवरही निशाणा साधला. ‘कंगनाने मुंबईची तुलना POK बरोबर केल्यावर तिला देशद्रोही ठरवणारे शिवसैनिक, फारुक अब्दुल्लाने “काश्मिरींना भारतापेक्षा चीन जवळचा” म्हटल्यावर देखील गप्प बसून आहेत. शिवसेनेचा खरा चेहेरा उघड झाला असल्याचे त्यांनी सांगितले.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here