अंबानी झाले कंगाल; पहा न्यायालयात काय म्हटलेय त्यांनी

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिच मॅन म्हणून जगात नंबर एककडे वाटचाल चालू असलेल्या मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल हे कंगाल झालेले आहेत. ब्रिटनच्या न्यायालयात त्यांनी याची अधिकृतरीत्या माहिती दिली आहे.

बातमी वाचून कोणीही दचकू शकतो. मात्र, ही बातमी अजिबात बंडल नाही. अनिल अंबानी यांनीच न्यायालयात माहिती दिलीय म्हटल्यावर ती खोटी तरी कशी असणार म्हणा. राफेल विमान भारतात बनवण्याचे कंत्राट अनिल अंबानी यांना मिळालेले आहे. तरीही त्यांची अशी स्थिती झाल्याने जगभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

इंडस्ट्रियल & कमर्शियल बँक ऑफ चाइना यांचे ५ हजार २८१ कोटी रुपये आणि त्यासाठीचा खर्च म्हणून ७ कोटी रुपये अशी सर्व रक्कम अंबानींनी १२ जूनला देण्याचे निर्देश होते. त्यावर सुनावणीत अंबानींनी आपली आर्थिक कंगाली असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे कोणतीही रोल्स रॉइस कार नाही. एक साधी कार फ़क़्त उरली आहे.

त्यांनी जानेवारी ते जून या महिन्यांमध्ये वकिलांचा खर्च देण्यासाठी घरातील दागिने विकले आहेत. त्यांच्या ९.९ कोटी रुपयांच्या पावत्याही त्यांनी त्यावेळी दाखवल्या आहेत. अंबानी यांनी म्हटले आहे की, सध्या त्यांच्याकडे जगण्यासाठीचे पैसेही नाहीत. उलट आई आणि मुलगा यांच्याकडून मोठे कर्ज घेतले असून त्यांचिया पत्नी त्यांना जगवत आहे.

अनिल अंबानी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ब्रिटनच्या न्यायालयात आपली बाजू मांडताना हे सर्व सांगत होते. त्यांची एकूण आर्थिक परिस्थिती आता अनेकांच्या कौतुकाचा भाग बनली आहे. कारण, याद्वारे स्पष्ट झालेले आहे की ते कंगाल झालेले आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here