भरलेली वांगे आवडतात ना; ते खाण्याचे फायदे वाचाल तर नक्कीच जास्त खाणार

वांग्याचे भरीत असो व भरलेली वांगे… तुम्ही चवीने खात असाल तर उत्तमच पण जरी नसेल खात तर हे फायदे वाचून नक्कीच वांगे खाणे चालू कराल. वांग्याचे अनेक औषधी गुण आहेत. आदिवासी भागांमध्ये अनेक ठिकाणी वांग्याचा उपयोग केला जातो.

हे आहेत वांगे खाण्याचे फायदे :-

१) वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन, डायबिटीज इत्यादी समस्या दूर होतात.

२) आदिवासी लोक खोकला आलं की वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकून खातात. त्यामुळे खोकला ब्रा होतो.

३) ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी वांग्याचे नियमितपणे सेवन करावे. कारण वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स असतात.

४) भाजलेल्या वांग्यावर चवीनुसार मध टाकून रात्री खाल्ल्यास शांत झोप लागते. 

५) वांग्यातील नासुनीन नावाचे रसायन शरीरातलं अतिरिक्त आयर्न नियंत्रित करते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here