‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’ म्हणत ‘या’ भाजप नेत्याने केला गौफ्यस्पोट

मुंबई :

कृषी विधेयकावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची भूमिका नेमकी काय हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली व पक्षाची शेतकरी विधेयकाविरुद्ध भूमिका मांडली. मात्र भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसने फक्त सभात्याग केला, विरोध दर्शवला नाही, असे स्पष्ट केले. यानंतर ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, असे म्हणत भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी घुमजाव केला आहे.

राणे यांनी स्पष्ट केले की, ‘राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल कृषी विधेयकावर बोलले खरे, पण त्यांनी विरोध केला नाही. त्यांनी केवळ सभात्याग केला. यावेळी राणे यांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवरही निशाणा साधला.

शिवसेना नेतृत्वाला शेतीची काही माहिती नाही. त्यांचा पक्ष शेतीच्या प्रश्नावर कधीही भूमिका घेत नाही असे म्हणत राणे यांनी शिवसेना संभ्रमात असल्याचे सांगितले. राणे म्हणाले की, ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं कृषी विधेयकावरील भाषण तळ्यात-मळ्यात होतं. शिवसेनेला नेमकं कुठं जायचं आहे हे माहीत नाही.

संपादन :विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here