पवारांसोबत राहून ‘त्यांनाही’ कोलांट्या मारण्याची सवय लागली; ‘या’ भाजप नेत्याची जळजळीत टीका

मुंबई :

सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकीय पटलावर अनेक वाद सुरु आहेत. राज्य सरकार अनेक वादांना सामोरे जात आहे. अशातच बिहार निवडणुकांचे बिगुल वाजले असून त्यावरूनही आता वादविवाद सुरु आहेत. कोरोनाच्या काळात निवडणुका लागल्याने त्यावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सतत पवारांसोबत राहून राऊतांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे’, असे म्हणत भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले की, कोरोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहेत. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका कोरोनाच्या काळातच झाल्या होत्या याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे.

नेमकं काय म्हणाले होते राऊत :-

बिहारमधील कोरोना संपला आहे का? संपला आहे असे निवडणूक आयोगाला व राज्यकर्त्यांना वाटत असेल तर तसे त्यांनी जाहीर करावे. या निवडणुका रेटल्या जाणार आहेत, असेही त्यांनी म्हटले होते.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here