जेव्हा डॉ.सिंग एका पत्रकार परिषदेसाठी तब्बल ७०० प्रश्नांची तयारी करतात; वाचा कधी न ऐकलेला किस्सा

आज माजी पंतप्रधान, जेष्ठ अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांचा वाढदिवस; देशासह जगाला माहिती आहे की हा व्यक्ती किती विद्वान आहे. पंतप्रधान असतानाही कुठलाही गर्व न बाळगणारे डॉ. मनमोहन सिंग हे किती अभ्यासू वृत्तीचे होते हे आपल्याला या किस्स्यातून लक्षात येईल. वाचा शेखर कल्याणी पायगुडे यांची पोस्ट जशीच्या तशी :-

The Accidental Prime Minister या पुस्तक पुस्तकात मी हा किस्सा वाचला आहे. डॉ. मनमोहन सिंह हे २००४ साली कोणाच्या ध्यानी मनी नसताना पंतप्रधान झाले होते. मनमोहन सिंह यांच्या अगोदरच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास आपल्याला असे लक्षात येते की ते फार कमी बोलतात आणि उत्तरे द्यायला मात्र घाबरत नाही. पंतप्रधान झाल्यावर मनमोहन सिंह यांनी प्रशासनाच्या १०० दिवसानंतर पत्रकार परिषद घेणार असे जाहीर केले. ही एक राष्ट्रीय पत्रकार परिषद होणार होती.

संजय बारू हे त्यांचे माध्यम सल्लागार होते. पत्रकार परिषदेत पत्रकार कोणतेही प्रश्न विचारू शकतात. त्यांना उत्तरे देणे अपेक्षित असते. ह्या सर्व गोष्टी लक्षात मनमोहन सिंह आणि त्यांचे सल्लागार यांनी राजकीय सामाजिक ते शीख दंगल असे सुमारे ७०० प्रश्न काढले होते आणि त्यावर उत्तरे तयार केली होती.

याचा अर्थ पत्रकार कोणते प्रश्न विचारू शकतात चुकीची, दिशाभूल करणारी माहिती न देता अधिकृत माहिती देणे केव्हाही चांगले जेणेकरून भविष्यात त्याचा त्रास होणार नाही.

त्यांनी इतकं कमालीचं नेतृत्व केलं होत. त्यांची पत्रकार परिषद यशस्वी झाली. देशाला ते बांधील असल्याचे सिद्ध झाले. लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला. याचं प्रामाणिकपणा आणि अभ्यासाच्या जोरावर ते १० वर्षे पंतप्रधान राहिले. देशाला २००८ सारख्या महामंदित देशाला वाचवले. विकासदर ७ टक्याच्या वर राहिला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here