पंतप्रधान असतानाही मान–मरातब यापलीकडे जाऊन मनमोहन सिंग कसे होते; वाचा ‘हा’ किस्सा

आज माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने जयदीप पिसाळ देशमुख यांनी लिहिलेली पोस्ट जशीच्या तशी :-

मनमोहनसिंग पंतप्रधान असताना पंजाबात एका ठिकाणी नव्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होते. ते उद्घाटन अर्थातच मनमोहन सिंग यांच्या हस्तेच होणार होते. रेल्वेमंत्री, समर्थक व मंत्रीमंडळातले काहीजण तिथे आले होते. लोकांची ही गर्दी होती. तेव्हा नवज्योतसिंग सिद्धु बहुदा मंत्री होते. मनमोहनसिंगांना तिथे पोहोचायला थोडा उशिर होणार होता. मेसेज सर्वांपर्यंत गेला. पण सिद्धु ऐकेल तर खरं. नवज्योत सिद्धु ने अर्धातास थांबुन अखेर तोच पुढे येवुन सर्वांसमक्ष उद्घाटन करुन मोकळा झाला!

पंतप्रधानांचा मान सिद्धु ने स्वत:कडे घेतला. का, तर त्यांना यायला वेळ होणार होता. म्हणुन! नंतर त्याने भाषण ही केले..नी तेवढ्यात मनमोहनसिंगांचा ताफा तिथे पोहोचला.त्यांना येताना समजले होते की त्यांच्याऐवजी नवज्योत सिंग सिद्धु ने रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले आहे. पण तरिही ते तिथे पोहोचले. अाल्यावर सर्वांनी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यावर ते फक्त इट्स ओके. इतकच बोलले. नी सर्वांना भेटुन तितक्याच सहजतेने तिथुन ते पुढल्या कामासाठी निघाले ही.

कार्यक्रमाचा मान सिद्धु ने घेतला म्हणुन कसला ही आरडाओरडा नाही. तोंडाची वाफ होईस्तोवर उगाच शब्दबंबाळ चर्चा नाही. की इगो दुखावुन घेतला नाही. त्यामुळे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे ही शांत राहिली. इट्स ओके. इतकच बोलुन त्यांनी तिथला आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी ते बोलते झाले. नी निघाले ही. अगदी सहजतेने.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here