असे बनवा घरच्या घरी तंदुरी चिकन; रेसिपी वाचा, ट्राय करा अन शेअरही करा की

वार कुठलाही असू द्या तंदुरी चिकन म्हणजे जिवाचा आणि जिव्हाळ्याचा विषय… अजूनही हॉटेल बंद असल्यामुळे तंदुरी चिकन काय साधा वडापाव खायला भेटत नाहीये. पण फिकर नॉट मंडळीहो….

आम्ही आज सांगणार आहोत घरच्या घरी तंदुरी चिकन कसं बनवायचं ते… तेही अगदी हॉटेलसारख..

ADVT. घरातील वस्तू खरेदी करण्यासाठीच्या ऑफर https://amzn.to/33Wost3 या लिंकवर जाऊन पहा आणि खरेदी करा.

घ्या साहित्य लिहून घ्या…

१) १ किलो चिकन

२) १ कापलेला कांदा

३) १ जुडी कोंथिबीर

४) २ मोठे चमचे कापलेला लसूण पेस्ट

५) २ लिंबाचे काप

६) २ मोठे चमचे कापलेले आल

७) २२५ ग्रॅम दही

८) १ मोठा चमचा दही

९) २ चमचे मिरची पावडर

१०) १ चमचा गरम मसाला

११) १/२ चमचा वाटलेली मेथी

१२)  १ चमचा चाट मसाला

१३) १ चमचा काळी मिरी वाटलेली

१४) ४-६ थेंब खायचा रंग

साहित्य घेतल्यावर मस्तपैकी चिकन तंदूर कसा बनवायचा हे बघा…

१) लसूण आणि आल्याची पेस्ट बनवावी, लसूण, आले पेस्ट दही मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, वाटलेली मेथी, चाट मसाला, काळी मिरी आणि लाल रंगात एका ग्लासात ८-१० मिनिटे फेटावे आणि एक सारखे करावे.

२) चिकन चांगल्या तऱ्हेने फेटावे.

३) मसाले टाकावे आणि मसाल्यास चिकनवर चांगल्या तऱ्हेने रगडावे. त्यानंतर ४-६ वेळा चिकन उलट, पालट करावे.

४) मेरीनेटड चिकन तंन्दूर मध्ये बेक करावे किंवा ओवन मध्ये २२० डिग्री सेल्सि, ४२५ सेल्सि. गॅस मार्कवर ७ वर सेट करावे. 

५) तारांच्या ट्रेवर ठेवून १० मिनिट बेक करावे नंतर पलटवून १० मिनिट बेक करावे.

 तुकडे करून लिंबू आणि कोथिंबीर टाकावी. गरम गरम खा मंडळी हो…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here