धक्कादायक : ‘ते’ १४ अॅप्लिकेशन पळवू शकतात तुमचे पैसे; पहा त्यांची यादी आणि काढूनही टाका

गुगल प्ले स्टोअरवरून सध्या लाखो मोबाइल अॅप्लिकेशन डाऊनलोड करता येतात. अनेकदा आपल्याला किरकोळ कामासाठी महत्वाचे वाटणारे आणि आपल्या मोबाइलात मग ठाण मांडून राहणारे अॅप्लिकेशन आपल्याला मोठी आर्थिक तसदी देऊ शकतात. गुगलच्या मदतीने सोफोस या कंपनीने अशा अॅप्लिकेशनची यादी प्रसिद्ध केली आहे.

ही सर्व अॅप्लिकेशन फोटो किंवा व्हिडिओ बनवून देणारी आहेत. त्यांच्याद्वारे सबस्क्रायबर करून घेताना आपण ही सेवा घेण्याचे बटन न दाबता पाठीमागे जाण्याचे बटन दाबले तरीही आपल्या खात्यातील पैसे जाऊ शकतात. अशा अॅप्लिकेशनची यादी पहा आणि आपल्या मोबाईलमध्ये असे अॅप्लिकेशन असल्यास तातडीने काढून टाका.

 1. कंप्रेस वीडियो
 2. डायनेमिक वॉलपेपर
 3. गेमट्रिस वॉलपेपर
 4. मोजिफॉन्‍ट
 5. मोन्‍टाज
 6. माई रेप्लिका 2
 7. ओल्‍ड मी- सिम्‍यूलेट ओल्‍ड फेस
 8. फोटो कन्‍वर्टर
 9. प्रैंक कॉल
 10. रिकवर डिलीटेड फोटो, फोटो बैक अप
 11. सर्च बाई इमेज
 12. वीडियो मैजिशियन
 13. एक्‍सस्‍लीप
 14. जायनोओ वॉलपेपर

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here