म्हणून मापात खावेत अंजीर; वाचा महत्वाची माहिती, कारण होतात ‘ते’ दुष्परिणाम

आहारचे योग्य संतुलन राखण्यासाठी आहारात भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डाळी, कडधान्ये इत्यादींच्या बरोबर फळांचाही समावेश असायलाच पाहिजे. आपण रोजच्या आहारात नक्कीच खायला पाहिजे अशाच फळांपैकी एक फळ म्हणजे अंजीर होय.

हे फळ ताजे असताना किंवा सुकविलेले अशा दोन्ही प्रकारे खाता येते. अंजीर हा सुकामेव्यातील एक महत्वाचा पदार्थ आहे. ताजे फळ किंवा सुकवलेले अंजीर हे असे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. मात्र, कोणतीही गोष्ट कितीही उपकारक असली तरी अतिरिक्त सेवन किंवा त्याचे माप सोडले की उपयोगी न ठरता उलट अपकारक ठरते.

सुकी अंजीर जास्त खाल्ल्यास दातांच्या किडण्याचे किंवा सडण्याचे कारण बनू शकतात. तसेच ज्यांना अंजीर फळाची एलर्जी असेल त्यांनी अंजीर खावू नये. यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच कोणताही पदार्थ आपल्या आहारात समावेश करावा. अंजिराचे सेवन संयमित करावे. कारण, जास्त सेवनाने पचनसंस्थेतून रक्तस्त्राव होऊ शकतो.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here