धक्कादायक : म्हणून बाजार समित्या अनिश्चित कालावधीसाठी बंद; पहा काय म्हणणे आहे व्यापाऱ्यांचे

एकीकडे देशभरात फार्मर्स बिल याच्या मुद्द्यावर रणकंदन सुरू असतानाच मध्यप्रदेश राज्यात वेगळाच पेच निर्माण झालेला आहे. तेथील व्यापाऱ्यांनी सर्व बाजार समित्या अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

सध्या या राज्यात खरेदी शुल्क हा वादाचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे अन्नधान्य, डाळी आणि तेलवर्गीय पिके यांच्या व्यापारी संघटनेने हा बंद जाहीर करून टाकला आहे. अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी याबाबत सांगितले की, सध्या राज्य सरकार शेतमालाच्या खरेदीवर १.५ टक्के इतके खरेदी शुल्क घेते. ते शुल्क ०.५ टक्के करण्याची मागणी व्यापाऱ्यांची आहे.

त्या मागणीला राज्य सरकारने केराची टोपली दाखवल्याने मग मध्यप्रदेश राज्यातील २७० बाजार समित्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रतिदिन किमान २०० कोटी रुपये किमतीची उलाढाल ठप्प होणार आहे. सुमारे ५० हजार वव्यापाऱ्यांनी या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. व्यापारी संघटनेने स्पष्ट केले आहे. की, फार्मर्स बिल या मुद्याचा आणि या बंदचा काहीही संबंध नाही.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here