‘हा’ आजार आढळल्यास तातडीने पशुवैद्यकांकडे संपर्क साधा; नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका

सध्या महाराष्ट्रात अनेक जनावरांना लम्पी स्कीन अर्थात अंगावर गाठी येण्याचा रोग दिसत आहे. अशा पद्धतीने आपल्या कोणत्याही जनावरांना या जराची लक्षणे दिसत असल्यास तातडीने नजीकच्या पशुवैद्यकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेने केले आहे.

ADVT. दुध वाढीसह जनावरांच्या योग्य पोषणासाठी वापरा VetMantra Cal Gold. ऑफरमध्ये खरेदीसाठी https://amzn.to/3mUw5sW या लिंकवर क्लिक करा.

पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी म्हटले आहे की, पशुपालकांनी आपल्या सर्व जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. गाय, बैल, म्हैस आणि रेडा अशा सर्वांना आणि सर्व वयोगटातील अशा जनावरांना याची बाधा होऊ शकते. अशावेळी वासरांमध्ये याची लक्षणे खूप टपकन दिसतात. तसेच देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या आजाराला पटकन बळी पडतात.

डास, माशा, गोचीड व इतर कीटकांच्या चावा घेण्याने या आजाराचा प्रसार होतो. अशावेळी आपल्या गोठ्यात असे परोपजीव राहणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. उष्णता आणि त्यात आर्द्रता वाढल्याने हा आजार वाढतो. यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी असले तरी यामध्ये जनावरे अशक्त होतात. तसेच जनावरांची प्रजनन क्षमता घटते. त्यामुळे वेळीच उपचार करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी केले आहे.

या आजाराची लक्षणे : ताप येणे, डोळे व नाकातून स्त्राव येणे, भूक मंदावणे. शरीरावर २ ते ५ सेंटीमीटर रुंदीच्या गाठी येणे. यामुळे जनावरांमध्ये प्रजनन क्षमता कमी होण्यासह गर्भपात होतो आणि दूधही कमी निघते. परिणामी मोठे आर्थिक नुकसान होते.

संपादन : सचिन पाटील

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here