आता ‘त्या’ नव्या कायद्यांमुळे शेतकरी गुलाम बनणार; राहुल गांधींचा हल्लाबोल

दिल्ली :

सध्या देशभरात शेतकरी विधेयक विरोधी आंदोलनाची लाट पेटली आहे. देशभरातील २०० पेक्षा अधिक शेतकरी संघटना या नव्या शेतकरी विधयाकाला विरोध करण्यासाठी आज भारत बंद आंदोलन करत आहेत. कॉंग्रेसनेही या शेतकरी विधेयकाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा देत या भारत बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. कॉंग्रेस या विधेयकावरून आक्रमक झाली आहे. कॉंग्रेस नेते व माजी खासदार यांनीही या विधेयकावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एका gst मुळे अनके लघु आणि मध्यम उद्योग नष्ट झालेले आहेत. आता नव्याने आलेल्या शेतकरी धोरण आणि कायद्यांमुळे शेतकरी गुलाम बनणार आहेत.

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना त्यांनी आपला भारत बंद ला जाहीर पाठींबा असल्याचेही स्पष्ट केले आहे. कालही त्यांनी मोदी सरकार हे शेतकर्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी आपली प्रसिद्धी करण्यात व्यस्त आहेत, असे म्हणत टीका केली होती.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here