करोनामुळे झाला ‘हा’ परिणाम; भारतीयांसह जगामध्ये झालाय ‘तो’ महत्वपूर्ण बदल

करोना ही जगाच्या इतिहासातील एक प्रमुख घटना आहे. यामुळे अवघ्या जगभरातील सर्व घटकांमधील नागरिकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण असे बदल झालेले आहे. एकूण सामाजिक वर्तन आणि आर्थिकदृष्ट्याही हे बदल झाल्याचे अनेक सर्वेक्षणातून पुढे येत आहे. ब्रिटनच्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने केलेल्या सर्वेक्षनातूनही यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.

जगभरातील ब्रिटेन, हांगकांग, भारत, इंडोनेशिया, केन्या, चीन, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापुर, ताइवान, संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिका या १२ देशांमधील १२००० लोकांचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून हा अहवाल तयार झालेला आहे. त्यात म्हटले आहे की, भारतीय मंडळी लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी सुमारे ५४ टक्के इतक्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीचा विचार करीत होते. आता तीच टक्केवारी थेट ६९ झाली आहे. तर, १० भारतीयांपैकी ९ जणांच्या खर्चावर परिणाम झालेला आहे.

होय, सध्या सगळेच आर्थिक संकटाचा मुकाबला करीत आहेत. अशावेळी खर्चावर सगळ्यांनी नियंत्रण आणलेले आहे. गरीब व मध्यमवर्ग यांच्या खर्चावर परिणाम झालेला आहे. त्याचवेळी मुबलक पैसे असलेले किंवा इतर मार्गाने पैसे कमाविणाऱ्या मंडळीच्या खर्चात काहीही परिणाम झालेला नाही. सध्या करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराचा मुकाबला करण्यासाठीचा प्रयत्न जगभरात होत आहे. अशावेळी किराणा समान, खाद्यपदार्थ, हेल्थ इक्विपमेंट, इम्युनिटी बुस्टर करणाऱ्या खाद्यपदार्थ व औषधे यांचा वापर मात्र वाढला आहे.

हे सर्वेक्षण दोन टप्प्यात झालेले आहे. आणखी तिसऱ्या टप्प्यावरील सर्वेक्षण अजूनही चालू आहे. एकूणच जगभरात करोना विषाणूमुळे मोठे बदल पाहायला मिळत असल्याचे यामुळे अधोरेखित झालेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here