सकाळपासून व्हायरल झालेलं ‘ते’ ट्वीट अजित दादांनी केलं डिलीट; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :

देशाचे आणि महाराष्ट्राचे राजकारण हे नेहमीच सभ्यता आणि संस्कृती पाळत चालणारे आहे. अर्थात गेल्या दशकापासून राजकीय सभ्यता आणि संस्कृती बाजूला हटवून त्याची जागा कठोर भूमिकेने घेतली आहे. त्याचे दाखले, पुरावे नेहमीच समोर येत असतात. भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन करणारे ट्वीट केले. सकाळच्या सुमारास हे ट्वीट सर्वच समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले दिसले. सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीने ते ट्वीट व्हायरल केले.

अखेरीस भाजप सोबत पहाटे शपथविधी करणाऱ्या अजित दादांनी ते ट्वीट डिलीट केले आहे. अजित पवारांकडून संघाच्या जेष्ठ नेत्याला अभिवादन करणारी पोस्ट व्हायरल होताच समाजमाध्यमांवर सक्रीय असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीची अजित पवारांना ट्रोल करायला सुरुवात केली. नंतर काही वेळातच सर्वच नेटकरी अजित पवारांच्या त्या ट्वीटवर तुटून पडले. ट्रोल होण्याचा अंदाज येताच पवारांनी ते ट्वीट डिलीट केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. आता ट्वीट डिलीट केल्यावरही अनेक जन अजित पवारांना ट्रोल करत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here