वाढदिवस विशेष: भारताचे खंबीर नेतृत्व करणारा, शांत असणारा असरदार ‘सरदार’

भारतात दोन मोठे गट आहेत. जे आपापल्या नजरेतून भारताच्या माजी आणि विद्यमान पंतप्रधानांना पाहतात. या दोघांची एका वाक्यात कारकीर्द सांगायची म्हणजे ‘एक आहे प्रचारामुळे निवडून आलेला पंतप्रधान तर दुसरा आहे अपप्रचाराचा बळी ठरलेला पंतप्रधान’.   

अपघाताने झालेला पंतप्रधान अशी त्यांची ओळख असली तरी त्यांच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेली उभारी निश्चितच वाखाणण्याजोगी होती. शांत, अबोल आणि सोनिया गांधी यांच्या मनाप्रमाणे वागणारा व्यक्ती अशी सिंग यांची प्रतिमा जनमानसात झाली असली तरी १-२ प्रसंग असे होते ज्यामुळे स्पष्ट होतं की डॉ. सिंग आणि सोनिया गांधी हे पक्ष धोरणाचे समन्वयाने निर्णय घेत असले तरीही सिंग त्यांचे बहुतांश निर्णय स्वतः घेत.

प्रसंग १ :- कॉंग्रेस अद्यापही महागाई आणि गरिबी ह्या परंपरागत विषयांना घेऊन प्रचार करत होती. दरम्यान सिंग यांची राजकारणात एन्ट्री झाली असली तरी सिंग हे तेवढे राजकारणाशी जुळवून घेणारे नव्हते. आमचे सरकार आले तर केरोसिन, मीठ, डिझेल, स्टोव्ह, पोस्टकार्ड, खाद्यतेलं आणि इतर काही वस्तूंचे दर पहिल्या १०० दिवसात १९९० साली असणाऱ्या दरापर्यंत नेऊ’ अशी घोषणा करण्यात आली. परंतु त्यानंतर काही दिवसातच सिंग यांनी ‘कॉंग्रसने दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे कोणतीही तयार यंत्रणा नसल्याचे जगजाहीर केले. त्यावरून कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ झाला होता.

आजही सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान कोण होते? असे विचारल्यास बरेच लोक पहिल्या क्षणाला मनमोहन सिंग यांचे नाव घेतील. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून किती ग्रेट आहेत हे कॉंग्रेसइतकंच रा.स्व.संघालाही माहिती आहे, असं म्हणणे थोडं धाडसाचे ठरेल पण ते खरेही आहे. कारण हा सरदार घुमा आहे, हे भारतीयांमध्ये पसरविण्यात संघाचा मोठा वाटा होता. कोणाला कसं मोठं दाखवायचं आणि कोणाला कसं कमी लेखायचं, याच तंत्र अवगत झालेल्या संघपरिवाराला हेही लक्षात घ्यावे लागेल की तात्पुरते खोटे दाखवणारे हे तंत्र आता त्यांनी उभ्या केलेल्या पंतप्रधानांही खोटे ठरवते आहे.

कोण असरदार होतं हे पहायचं असेल तर काही बेसिक गोष्टींची तुलना खरोखरच व्हायला हवी.

  • – जीडीपी
  • – गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर या महत्वाच्या पिकांचे हमीभाव
  • – जाती-धर्म वाद
  • – पेट्रोल- डीझेल, रॉकेल, तेल, डाळ आणि इतर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची महागाई

जेष्ठ अर्थतज्ञ व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here