समजून घ्या शेळ्यांच्या निवडीचे ‘जावई’शास्त्र; व्यवसायासाठी आहे महत्वाचे

गोट फार्मिंग करून मी काहीच वर्षांमध्ये कोट्याधीश होणार, अशी स्वप्नं पाहायला अजिबात हरकत नाही. त्यासाठीचे काही सूत्र आणि टिप्स आपण या लेखमालेच्या पुढील काही भागात अभ्यासणार आहोतच. मात्र, मुळात शेळीपालन सुरू करतानाची काही महत्वाची शास्त्रीय माहिती आपण अगोदर पाहूयात की.. कारण, पाया पक्का असेल तरच इमारत भक्कम राहील.. जसे की आडात नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार..?

तर, मित्र-मैत्रिणींनो, शेळीपालक म्हणून आपण या व्यवसायाचे पालक असतो. त्यामुळे शेळ्यांची काळजी घेणे ही प्राथमिक जबाबदारी आपलीच असते. शेळी व बोकड यांच्यासाठीच्या आहाराची सूत्र आणि व्यावहारिक गणित लक्षात घेऊन याचे नियोजन करावे लागते. तसेच या प्राण्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते. त्यासाठी अगोदर महत्वाची गरज असते ती जातिवंत शेळ्यांची. आपल्याला कोणता रंग आणि शिंगे आवडतात, यावर याचे यशाचे गणित ठरत नाही. बाजाराची मागणी काय आहे, त्यावर फोकस करून शेळ्यांची जात निवडावी. आपण स्थानिक भागात विक्री करणार की मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात. यावर आणि आपली आर्थिक गुंतवणूक क्षमता याचा मेळ घालून जातींची निवड करा.

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

शेळ्यांची निवड करण्याचे ‘जावई’ नावाचे शास्त्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी, जि. अहमदनगर) येथील तज्ञ सांगतात. त्यामध्ये ‘जा’ म्हणजे जात, ‘व’ म्हणजे वय आणि ‘ई’ म्हणजे इष्ट गुणधर्म असे घटक येतात. आपल्या महाराष्ट्रातील उपलब्ध जाती असोत की, भारतातील किंवा परदेशी संकरीत जाती असोत. हाच निकष लावून शेळ्यांची निवड करावी.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

यामध्ये ‘जात’ हा महत्वाचा घटक आहे. स्थानिक हवामानामध्ये वाढणाऱ्या आणि विकसित झालेल्या शेळ्या शक्यतो निवडाव्यात. कारण, त्यामुळे आपला आहार आणि मुख्य म्हणजे आरोग्य यावरील खर्च मापात राहतो. इतर भागातील शेळ्याही आपण गोठ्यात वाढवू शकतो. मात्र, अशावेळी आपली खर्चाची क्षमता महत्वाची ठरते.

वय हा घटक शेळ्यांच्या निवडीत लक्षात घ्यावाच लागतो. माणसांमध्ये कितीही ज्येष्ठतेला महत्व असले तरी शेळ्या व जनावरांमध्ये योग्य आणि कमी वयाला महत्व असते. इथे अनुभव नाही, तर कार्यक्षमता महत्वाची असते. (आता माणसांच्या व्यावहारिक जगातही हाच नियम लागू होतोय) शेळीचे पैदाशीचे वय ८ ते १० वर्षे असते. मात्र, तिला जास्तीतजास्त ७ वर्षे वयाची असताना सांभाळणे योग्य असते. निवड करताना दोन दाती (वय २ वर्षे) किंवा तीन दाती (वय ३ वर्षे) अशाच शेळ्या निवडाव्यात. नराचे वय तर दोन दाती (दीड ते २ वर्षे इतकेच) असायला पाहिजे. ७ वर्षांपुढील शेळ्या शक्यतो कळपातून काढून टाकाव्यात. तसेच बोकडाचे वय जास्तीतजास्त ५ वर्षे असेच असावे. कळपातील नर डर दोन वर्षांनी बदलावा. नाहीतर अंतरप्रजनन होऊन कळपाचे सर्वांगीण आरोग्य धोक्यात येईल.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

इष्ट गुणधर्म यामध्ये १. शारीरिक ठेवण, २. वजनवाढ क्षमता, ३. प्रजोत्पादन क्षमता आणि ४. दुग्धोत्पादन क्षमता या चार मुद्यांकडे काटेकोर लक्ष द्यावे.

अशा पद्धतीने ‘जावई’ सूत्राचा वापर करून शेळ्यांची निवड करावी. उगीचच प्रिंट, इलेक्ट्रोनिक माध्यमे किंवा सोशल मीडियामधील लेख व व्हिडिओ यांच्या आधाराने गोट फार्मिंग करायला जाऊ नका. त्यांच्या ‘जावई’शोधाला अजिबात बळी पडू नका. नफाच मिळतो असे सांगणाऱ्या सल्लागार किंवा व्यावसायिक मंडळींपासून चार हात दूर राहा. उलट यश येण्यासाठी अपयशातून कसा मार्ग काढला, असे सांगणारे शेळीपालकांना भेटा आणि माहिती घ्या. त्याला जिद्द, कष्ट, अभ्यास व चिकाटी यांची योग्य पद्धतीने जोड द्या.. मग यश तुमचेच असेल..!

(क्रमशः)

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

*(ता. क. : अगोदरचे लेख तांत्रिक कारणाने पोर्टलवर दिसत नसल्याने (डिलीट झाल्याने) वाचकांच्या आग्रहास्तव हे लेख पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here