फार्मर्स बिल शेतकरीविरोधी नाही; कृषिमंत्र्यांनी केले आश्वस्त, पहा काय म्हटलेय त्यांनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फार्मर्स बिल हे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारे महत्वाचे पाउल असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि शेतकऱ्यांच्या संघटनांनी हे कॉर्पोरेटधार्जिणे असल्याचे आरोप करून देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यावर अगदी अर्ध्या रात्रीही शेतकऱ्यांशी बोलण्यास तयार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटले आहे.

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

तोमर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, कॉंग्रेस पक्षानेच २०१९ च्या निवडणूक घोषणापत्रात हे बिल आणण्याचे म्हटले होते. आता तीच कॉंग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यास विरोध करीत आहेत. ही दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी म्हटले की, विरोधी पक्ष आणि शेतकऱ्यांच्या संघटना निराधार आरोप करून याप्रकरणी शेतकऱ्यांमध्ये खोटी माहिती पसरवत आहेत.

त्यांनी याबाबत आश्वस्त करताना म्हटले की, अगदी अर्ध्या रात्री उठूनही आम्ही शेतकऱ्यांशी यावर चर्चा करायला तयार आहोत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हित होणार आहे. त्यामुळे काहींना यातही राजकारण करण्याची हुक्की आलेली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here