शेतकरी आंदोलन : देशभरात आज होणार निदर्शने; पहा कुठे काय होऊ शकते ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मंजूर करून घेतलेल्या फार्मर्स बिलच्या विरोधात आज देशभरात अनेक शेतकऱ्यांच्या संघटना आणि राजकीय पक्षांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. उत्तर भारतात यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मोदी सरकारने लागू केलेल्या विधेयकांमुळे शेतीमध्ये कॉर्पोरेटवाले बिनदिक्कत येतील असा आरोप अनेक शेतकऱ्यांच्या संघटनांचा आहे. तर, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी तसे काहीही होणार नसू शेतकऱ्यांशी अगदी अर्ध्या रात्री उठूनही याप्रकरणी शंकानिरसन करणारी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

या बिलास सर्वाधिक विरोध हा पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशातील दिल्लीनजीकच्या शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बडे शेतकरी विरुद्ध छोटे शेतकरी असेही स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच याद्वारे नेमके काय बदल होणार, ते शेतकऱ्यांच्या हिताचे असतील की मोठ्या कंपन्या यांच्या हिताचे असतील हेच शेतकऱ्यांना समजेनासे झालेले आहे. दोन्ही बाजू आक्रमकपणे आपली बाजू मांडत आहेत. त्यामुळे काहीही माहिती नसलेले यावर काय भूमिका घ्यावी याच पेचात सापडले आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here