महाविकास आघाडीला मोठा धक्का; नगरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र; शिवसेनेचा ‘असा’ झाला गेम

अहमदनगर :

राज्याच्या राजकारणात कशीही समीकरणे जुळली तरी नगरच्या राजकारणाची गणिते मात्र वेगळ्याच पद्धतीने सोडवली जातात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठींब्यावर आजही अहमदनगर शहराचे महापौरपद भाजपकडे आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवत असताना नगरमध्ये नेहमीप्रमाणे परफेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांनी पुरेसे संख्याबळ असतानाही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले आहे. अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत घड्याळाने कमळाची साथ देत वेळ जिंकली आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी भाजप नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश करत शिवसेनेचा गेम केला. नगर लोकसभेला शिवसेनेने भाजपला मदत केली होती. पण विधानसभेच्या वेळी शिवसेनेचा उमेदवार असताना भाजपने पद्धतशीरपणे ज्यांचा प्रचार करायचा त्यांचाच केला. आता यावरूनही महाविकास आघाडीत फुट पडण्याची शक्यता आहे. भाजप नगरसेवक मनोज कोतकर राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. पुन्हा एकदा नगर शहरात सोयऱ्या- धायऱ्याचे राजकारण चालते, हे स्पष्ट झाले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here