कमी किमतीत घर, दुकान खरेदी करण्याची संधी; पहा त्यासाठी SBI ची वेबसाईट

अनेकदा आपण गुंतवणूक कार्याची म्हणून किंवा भविष्याचे स्वप्न म्हणून आवाक्यात नसतानाही घर किंवा दुकानाची जागा खरेदी कर्जावर करतो. मात्र, नंतर ते आपल्या आवक-जावक यांच्या गणितात बसत नाही. मग बँक किंवा वित्तसंस्था त्याचा लिलाव करते. स्टेट बँक ऑफ इंडिया यांनीही अशाच मालमत्तांचे लिलाव जाहीर केले आहेत.

३० सप्टेंबर २०२० रोजी ही लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यामध्ये सुमारे १००० ओपन प्लॉट, फ्लॅट, रेसिडेंसीअल, इंडस्ट्रीअल आणि कमर्शिअल प्रॉपर्टी आहेत. देशभरातील प्रमुख शहरात असलेल्या या मालमत्ता कमी किमतीत विकत घेण्याची संधी सर्वांसाठी खुली आहे. होय, खूळ असली तरीही आपल्याकडे जर यासाठीची तजवीज सहजपणे होणार असेल तरच यामध्ये सहभागी व्हा.

अशा पद्धतीच्या संपत्तीची खरेदी करण्यासाठी आता आपण पोर्टलवर जाऊन सर्व माहिती व्यवस्थित भरावी. त्यासाठी अगोदरच नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात. गरज वाटत असेल किंवा शक्य असल्यास संबंधित शाखेत जाऊनही आपण माहिती घेऊ शकता.

आपण यासाठी इच्छुक असल्यास खालील लिंकवर क्लिक करून माहिती घ्या :

·  सी1 इंडिया प्राईवेट लिमिटेड: https://www.bankeauctions.com/Sbi

·  ई-प्रोक्योरमेंट टेक्नोलॉजीज लि.: https://sbi.auctiontiger.net/EPROC/

·  प्रॉपर्टी के डिस्प्ले के लिए : https://ibapi.in

·  नीलामी प्लेटफॉर्म के लिए: https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here