PUBG प्रेमींनो वाचा महत्वाची बातमी; पहा काय आहे या गेमचे भवितव्य

पब्जी अर्थात PUBG नावाची ऑनलाइन व्हिडिओ गेम अनेकांचा जीव की प्राण बनली होती. ती गेम बंद झाल्याने अनेकांना आपल्या जीवनातून काहीतरी मोठी गोष्ट हिरवल्याचे वाटत आहे. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

PUBG खेळणाऱ्या मित्र-मैत्रिणींनो, ही गेम पुन्हा भारतात आणण्याची तयारी मूळ कोरियन कंपनीने केली आहे. त्यासाठी सध्या भारतासह अनेक देशांमध्ये पार्टनर असलेल्या चीनी कंपनीशी असलेला करार मोडीत काढून आपल्याच पद्धतीने पुन्हा भारतात येण्याची तयारी कंपनीने केली आहे. दक्षिण कोरिया देशातील त्या कंपनीला यात कितपत यश येते माहित नाही. मात्र, भारत सरकारने त्यांना हिरवा कंदील न देण्याचेच धोरण ठेवले आहे.

त्यातच द हिंदू नावाच्या वृत्तपत्राच्या बिजनेस लाईन या अर्थपत्राने रिलायन्स जिओ कंपनी भारतात त्यांच्या पार्टनर बनून ही गेम पुन्हा आणण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी कंपनीची चर्चा चालू असल्याचे बातमीत म्हटले आहे. एकूणच ही गेम पुन्हा खेळता येणार किंवा नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here