झुनझुनवालांचा पोर्टफ़ोलिओ घसरला; शेअर बाजारात घट झाल्याने बसला ‘इतका’ फटका

मागील सलग सहा दिवस शेअर बाजारात घट होत आहे. आणखी काही दिवस हा नकारात्मक ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आणि भीती व्यक्त होत आहे. अशावेळी सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनाही मोठा फटका बसला आहे.

झुनझुनवाला म्हणजे भारतीय शेअर बाजारातील एक प्रमुख इन्व्हेस्टर. मात्र, त्यांनाही या मंदीने ग्रासले आहे. त्यांचे अनेक शेअर घसरल्याने त्यांच्या पैशांमध्ये मोठी घट झालेली आहे. त्यांच्या एकूण पोर्टफ़ोलिओमध्ये २४ टक्के इतकी घट झालेली आहे. एडलवाइज फाइनेंशियल सर्विसेज यांचे १.१९ टक्के शेअर त्यांच्याकडे आहेत. या कंपनीचे शेअर मागील सह दिवसात २४.१० टक्के इतका कमी झाला आहे.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी लॉकेट ब्लूटूथ वायरलेस फ़क़्र रु. ७५०/-. घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

तर, त्यांच्याकडे ३.१८ टक्के हिस्सेदारी असलेल्या डिशमैन कार्बोजेन एम्सिस याचेही शेअर १८ टक्क्यांनी खाली आलेले आहेत. ऑटोलाइन इंडस्ट्रीजचे ६.४८ टक्के शेअर त्यांच्याकडे असून त्यात १७ टक्के इतकी घट झालेली आहे. करूर वैश्य बँक आणि झुनझुनवाला यांच्याकडे असलेल्या टायटनच्या ५००० कोटींचे शेअरही कमी झालेले आहेत. प्रकाश इंडस्ट्रीज, वीआईपी इंडस्ट्रीज, जीएमआ इंफ्रा, मंधना रिटेल, आयन एक्सचेंज, इंडियन होटल्स, फेडरल बँक यांच्यामध्ये १० टक्के तर, एस्कॉर्ट्स, क्रिसिल, ल्यूपिन यांच्या शेअरमध्येही घट झाल्याने झुनझुनवाला यांना झटका सहन करावा लागला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here