योगी सरकारने महिला अत्याचाराबाबत घेतला महत्वाचा निर्णय; आरोपींना करणार बेइज्जत..!

उत्तरप्रदेश म्हणजे बिहारच्या शेजारील आणि बिहारला टक्कर देणारे गुंडाराज राबवणारे राज्य अशीच खासियत आहे. इथे दररोज भयानक गुन्हेगारीच्या घटना घडतात. महिला आणि मुली तिथे अजिबात सुरक्षित नाहीत. राज्याचे हेच नकारात्मक चित्र बदलण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तांच्या सरकारने एक ठोस कार्यक्रम जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी जाहीर केले आहे की, कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिला आणि मुलींवर अत्याचार किंवा छेडछाडीच्या घटना घडल्यास संबंधित बीट इन्चार्ज आणि ठाणे इन्चार्ज यांना जबाबदार धरले जाईल. असे कृत्य करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांचे पोस्टर चौकात लावले जातील. महिला पोलीस कर्मचारी अशा आरोपीला योग्य ती शिक्षा देतील.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

एकूणच महिलांच्या अत्याचाराच्या घटनांना अजिबात सहन केले जाणार नसल्याचे योगीजींनी स्पष्ट केले आहे. मात्र, यापूर्वी अनेकदा इतर पक्षांसह या राज्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनीच गरीब महिलांना दिलेल्या अमानवीय वागणुकीबद्दल आतापर्यंत योगी सरकारने चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे आताही या निर्णयाची ठोस अंमलबजावणी होणार की पुन्हा ही फ़क़्त एक घोषणा राहणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here