धक्कादायक : चीन्यांनी डोकलामजवळ तैनात केलेय अणुबॉम्बर व क्रुझ मिसाईल..!

भारत-चीन सीमेचा विवाद कमी होण्याची काहीही शक्यता दिसत नाही. जगभरात जसा निवडणुकीचा ज्वर वाढत आहे. तसाच चीनच्या कागाळ्या आणखी वाढत आहेत. आताही त्यांनी एकीकडे भारताशी चर्चेचे नाटक केलेले असतानाच आता डोकलाम या सीमेलगतच्या भागात थेट अणुबॉम्बर आणि क्रुझ मिसाईल तैनात केल्याची बातमी येत आहे.

सुप्रसिद्ध हिंदी दैनिक नवभारत टाईम्स यांनी ही ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, भूतान लगतच्या भागात चीनने आपल्या कारवाया वाढवल्या आहेत.एकीकडे लडाखमधील भागात तणाव असतानाच आता पूर्व सीमेवरही चीन भारताशी कुरापती काढीत आहेत.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी लॉकेट ब्लूटूथ वायरलेस फ़क़्र रु. ७५०/-. घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

डोकलाम भागात अणुबॉम्बर (अणुबॉम्बसह मारा करणारे विमान) व क्रुझ मिसाईल तैनात केलेले आहे. H-6 परमाणु बॉम्‍बर असे त्याचे नाव आहे. भारताच्या सीमेपासून ते फ़क़्त ११५० किलोमीटर दूर आहे.  ओपन सोर्स इंटेलिजेंस एनॉलिस्ट Detresfa यांनी प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट इमेजेसद्वारे चीनचा हा प्रकार उघडकीस आलेला आहे. डोकलाम भागात चीनच्या प्रदेशात बहुमजली इमारती बांधण्यात येत आहेत. तसेच इथे अनेक प्रकारचे सैन्य आणि शस्त्रास्त्रे ठेवण्यात आल्याचेही दिसत आहे. एकूणच या भागात चीन काहीतरी वेगळा आणि आक्रमक डाव खेळत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

मूळ बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :

https://navbharattimes.indiatimes.com/world/asian-countries/china-dangerous-move-against-india-nuclear-bomber-cruise-missile-deployed-near-doklam/articleshow/78293501.cms

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here