मोदींनी सांगितली त्यांच्या हेल्दी पराठ्याची माहिती; पहा काय रहस्य आहे त्यांच्या फिट न् फाईन तब्बेतीचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट न् फाईन तब्बेतीचे किस्से अनेकदा रंगवून सांगितले जातात. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या अमुक कामाबद्दल किंवा इतक्या जास्त तास काम करण्याच्या किमयेबद्दल अनेकदा जगजाहीर बोलत असतात. मात्र, आत नरेंद्र मोदी यांनी स्वतःच आपल्या फिट न् फाईन तब्बेतीचे रहस्य जगजाहीर केले आहे.

फिट इंडिया मुव्हमेंट या चळवळीला आता एक वर्ष झाले आहे. त्यानिमित्ताने मोदींनी ऑनलाईन वार्तालापात देशातील महत्वाच्या आणि हेल्दी मंडळींशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, देवेंद्र झाझरिया, मॉडल-रनर-ऐक्टर मिलिंद सोमन, न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर आदींना निमंत्रित करण्यात आलेले होते.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

त्यात मोदींनी आपल्या हेल्थचे रहस्यही सांगितले. त्यांनी म्हटले की, मोरिंगा अर्थात शेवग्याच्या पानांचा पराठा त्यांना खूप आवडतो. शेवगा हे एक सर्व जीवनसत्व आणि खनिजे यांचा स्त्रोत असलेले महत्वाचे अन्न आहे. त्याची सेवनाने शिरीर फिट न् फाईन राहते. त्यांची आई अनेकदा फोनवर हळदीचे दुध घेण्याची आठवण करून देत असल्याचेही मोदींनी म्हटले आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here