‘त्या’ बँकेनेही आणली पॉवर राईड स्कीम; दुचाकी घेण्यासाठीची आली संधी

महिलांना आत्मनिर्भर करणारी आणि त्यांना पॉवर राईडची संधी देणारी स्कीम आता पंजाब नॅशनल बँकेने आणली आहे. फेडरल बँकेने अवघ्या १ रुपयात गाडी घरी नेण्याची स्कीम आणल्यानंतर आता बँक आणि दुचाकी मार्केटमध्ये नवीन स्कीम येण्यास सुरुवात झालेली आहे.

फ़क़्त ८ हजार रुपये मासिक इन्कम असलेल्या महिलांनाही याद्वारे आपली हक्काची दुचाकी खरेदी करता येणार आहे. या स्कीममधून बाईक, स्कुटी आणि मोपेड घेण्यासाठी आपण नजीकच्या बँक शाखेत संपर्क साधावा. यामध्ये जास्तीतजास्त कर्ज रक्कम (लोन अमाउंट) ही ६० हजार रुपये असेल. १० टक्के रक्कम ग्राहकांना आपल्या बँक खात्यातून किंवा कॅश द्यावी लागणार आहे.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

कमाल ३६ महिन्यांसाठी व्याजावर महिला या योजनेतून दुचाकी गाडी खरेदी करू शकतात. ज्यांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी ६ महिने पूर्ण केले आहेत. ज्यांनी किमान १ वर्षे आपला व्यवसाय चालवला आहे. असे ग्राहक थेट या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, जर कॉलेज विद्यार्थिनी असेल तर त्यांनी किंवा कमावती महिला नसेल तर त्यांनी आपले पालक, वडील, आई किंवा पती यांच्यासह या योजनेसाठी अर्ज करण्याची सोयही आहे.

यासाठीचे कागदपत्र व्हेरिफिकेशन चार्जेस हे ५०० ते १००० रुपये असतील. तसेच याचा वार्षिक व्याजदर ८.७० टक्के असणार आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here