‘ग्लोबल वार्मिंग’चे परिणाम; यंदा हॉट सप्टेंबर, पहा भविष्यात काय होऊ शकते ते

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सध्या पावसाने कल्टी मारली आहे. पाऊस होत नसल्याने येथील तापमानात वाढ झालेली आहे. शुक्रवारी इथे काही भागात तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मागील १५ वर्षांमधील सर्वाधिक हॉट सप्टेंबर राहण्याची शक्यता आहे.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी लॉकेट ब्लूटूथ वायरलेस फ़क़्र रु. ७५०/-. घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

यंदा दिल्लीतखूप कमी पाउस होत आहे. आताही ढग येतात मात्र, पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. यंदा राष्ट्रीय राजधानी परिसरात सप्टेंबर महिन्यात फ़क़्त २० टक्के इतकाच पाऊस झाला आहे. २०१५ मध्येही अशी परिस्थिती होती. यापूर्वीही दिल्लीत १९९४ मध्ये फ़क़्त १.४ मिलीमीटर इतका कमी पाऊस झाला होता. एकाच जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने सध्या इथे या महिन्यात २०.९ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

एकूण परिस्थिती लक्षात घेता. पुढील कालावधीत दिल्ली आणि देशभरात जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम आणखी ठोस पद्धतीने दिसण्याची शक्यता आहे. वर्ल्ड इकनॉमिक फोरम यांच्या सेस्टेनेबल डिवेलमेंट इम्पैक्ट समिटमधील रिपोर्टनुसार भारतात ग्लोबल वार्मिंगचे परिणाम दिसण्याची शक्यात आहे. वर्ष २१०० मध्ये तर दिल्लीत उन्हाळ्याचे महिने ६ नाही, तर ८ होतील असेही त्यात म्हटले आहे.

पर्यावरण या महत्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्याचे हे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात आणि आपल्या पुढील पिढ्यांना नक्कीच भोगावे लागतील. त्यासाठी भारताने आपल्या विकासामध्ये पर्यावरणाचे संवर्धन करून ढोर राबवण्याची गरज आहे. नाहीतर दुर्दैवाने विकास होण्याच्या नावाखाली आपली सुंदर आणि निसर्ग संपदेने नटलेली ही भारत भूमी उजाड झाल्याचे आपल्या आणि आपल्या पुढील पिढ्यांना पहावे लागेल. 

संपादन : सचिन मोहन चोभे

ADVT. बेस्ट क्वालिटी ब्लूटूथ हेडसेट फ़क़्त रु. ९९९/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/33RCGeV या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here