शेतमाल प्रक्रियेसाठी येणार मेगा पॉलिसी; होणार १५ हजार कोटींची गुंतवणूक

शेतमालावरील प्राक्रिया आणि त्याचे योग्य पद्धतीने वितरण करणे ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून उत्तरप्रदेश सरकारने आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी नवीन मेगा पॉलिसी आणण्याची तयारी केली आहे. ज्याद्वारे छोटे, माध्यम आणि मोठ्या उद्योगांना लाभ होईल.

ADVT. बेस्ट क्वालिटी ब्लूटूथ हेडसेट फ़क़्त रु. ९९९/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/33RCGeV या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जावे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याची ऑनलाईन पद्धतीने याबाबत बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, भारतातील ७० टक्के लोकसंख्या गावात राहते. मात्र, तिचे देशाच्या एकूण जीडीपीमधील योगदान फ़क़्त २७ टक्के आहे. अशावेळी ग्रामीण भागातील रोजगार वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. सध्या शेतात उत्पादित होणाऱ्या फ़क़्त ६ टक्के मालावर प्रक्रिया होते. पुढील पाच वर्षांमध्ये याची टक्केवारी आपल्याला २० वर न्यावी लागेल.

त्यासाठी या उद्योगामध्ये किमान १५ हजार कोटी रुपये गुंतवणूक आवश्यक आहे. त्यासाठीचा ड्राफ्ट सरकार बनवत आहे. फ़क़्त उत्तरप्रदेश राज्यात योग्य पद्धतीने साठवणूक आणि वितरण पद्धती नसल्याने प्रतिवर्षी ७० हजार कोटी इतके अन्नधान्य खराब होते. ही नासाडी थेट शेतकऱ्यांनाही मोठा फटका देते. त्यामुळेच या क्षेत्रात म्हणजे वखार आणि कोल्ड स्टोअरेज यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठीच्या स्कीम राबवल्या जात आहेत. उद्योगांना सौर विद्युत उर्जेच्या वापरासाठी आणि त्याद्वारे सक्षम होण्यासाठी ठोस मदतीची तयार योगी सरकारने दाखवली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here